गावठाण पासून हाकेच्या अंतरावर असणार्या एकाच कुटुंबातील दहा जणांना काल कोरोनाची बाधा झाल्याने कातरखटावकरांची झोप उडाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 1) पासून चार दिवसांसाठी गावात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय कोरोना कमिटीने घेतला आहे.
कातरखटाव : गावठाण पासून हाकेच्या अंतरावर असणार्या एकाच कुटुंबातील दहा जणांना काल कोरोनाची बाधा झाल्याने कातरखटावकरांची झोप उडाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 1) पासून चार दिवसांसाठी गावात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय कोरोना कमिटीने घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी झालेल्या कातरखटाव गावात ऐन बेंदूर सणादिवशी परराज्यातून आलेल्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आजअखेर एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र, दोन दिवसांपूर्वी 49 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील चौदा जणांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये दहा जाणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामध्ये एक वर्षाच्या लहान मुलीसह तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. त्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांना याची माहिती मिळताच परिसर सील केला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची कसून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकरी डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. स्वप्नील वायदंडे, पोलीस पाटील घनशाम पोरे, आरोग्य कर्मचारी कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे.