कोयना धरणात 24 तासात 2 टीएमसी पाणीसाठा वाढला
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
Published:Jul 05, 2022 05:36 AM | Updated:Jul 05, 2022 05:36 AM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटण ः गत दोन आठवड्यांपासून ओढ दिलेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये 24 तासात 2 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रासह कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे पावसाचा जोर वाढला असून कोयना धरणामध्ये 24 तासात 2 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 74 मिमी, ननवजा येथे 118 मिमी, तर महाबळेश्वर येथे 129 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणामध्ये 16 टीएमसी पाणीसाठा असून 10.88 टीएमसी उपुयक्त पाणीसाठा आहे. पावसाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील रखडलेल्या पेरण्यांना गती मिळणार असल्यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.