पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी 2 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 8 किलोमीटरवर हेळवाक गावचे नैऋतेस 6.0 किलोमीटर अंतरावर आहे. या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी आहे. या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली 4 किलोमीटर इतकी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत अथवा वित्तहानी झाली नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.