कराड तालुक्यातील पाडळी येथे शेततळ्यात पोहायला गेलेल्या तिघे जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली रागिणी रामचंद्र खडतरे वय ४, वैष्णवी गणेश खडतरे वय १५, शोभा नितीन घोडके वय ३२ अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाडळी तालुका कराड येथे आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे नऊ ते दहा जण गेले होते. यावेळी तिघी जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर सहा जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेने संपूर्ण पाडळी परिसर हादरून गेला. या घटनेची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे