सातारा : देशभरासह राज्यात पुन्हा कोरोना रुग्ण संख्या वाढत चालली असताना सातारा जिल्ह्यामध्ये ही गेल्या सात दिवसांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट चे प्रमाण वाढले आहे. यातच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ते गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो. - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई.