कोयना धरण पाणीसाठ्यात 24 तासात 5 टीएमसीने वाढ
पाणीसाठा 52 टीएमसी; पावसाचा जोर कायम
Published:Jul 16, 2022 05:09 AM | Updated:Jul 16, 2022 05:09 AM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
कोयना पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र पावसाचा जोर कायम असून चोवीस तासात धरणात 5.10 टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. धरणामध्ये 52.15 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने धरणात 61 हजार 108 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. आज सकाळी 8 वाजपेर्यंंत कोयना येथे 153, नवजा येथे 162 तर महाबळेश्वर येथे 178 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून 2100 क्युसेक्स विसर्ग सुरूच आहे. धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 52.15 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 49.55 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात धरणात 5 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पायथा वीजगृहातून सुरू आहे.