पर्यावरणदिनानिमित्त वणवा थांबवा योजनेचा सोमवारी शुभारंभ
News By : कराड | संदीप चेणगे
कराड, दि. 3 ः जागतीक पर्यावरणदिनानिमित्त श्वास फाउडेशन इंडिया संचलित ‘श्वासपर्यावरण' या समाजसेवी संस्थेतर्फे 'वणवा थांबवा' या योजनेचा शुभारंभ होत आहे. ढेबेवाडी-भोसगांव येथे सोमवारी (दि. 5) वनविभागाच्या गेस्ट हाऊस व बटरफ्लाय गार्डन मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये र्डा. संजय पवार हे 'पर्यावरण व आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. पर्यावरणाबाबत ग्रामीण लोकात जनजागृती व्हावी म्हणून परिसरातील प्रत्येक गावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करून या कार्यक्रमात सामिल करून घेतले जाणार आहे. कार्यक्रमामध्ये सातारा वनविभाग सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व वनरक्षक सुदधा मार्गदर्शन करणार आहेत. या समाजउपयोगी कार्यक्रमात परिसरातील सर्व नागरिकांनी भाग घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे. महाराष्ट्रात विशेष म्हणजे सहयाद्रिच्या डोगरकपारीत डोगर जाळणे किंवा वनवा लावणे यामुळे आपल्या पर्यावरणाचे अभिजात नुकसान होत असते. वनव्यामुळे लाखो नवीन रोपेव झाडे जळत असतात. सतत पाच ते सात वर्ष डोगर जळतात.परत अशा डोगरावरती कोणतेही मोठे झाड शिल्लक राहत नाही किंवा जगत नाही कारण आपण सर्व लहान झाडे जाळून टाकलेली असतात. या डोगर जाळण्यामुळे आपण अनेक वन्यजीव मारतो. त्यामध्ये विशेषता ससे, भेकरे किंवा मोठ्या जनावराची लहान पिले मरून जातात. त्यामुळे सुदधा वन्यप्राण्याचे जगणे मुश्किल होऊन जाते. जंगलाचा -हास झाल्यामुळे अनेक झाडाच्या व प्राण्याच्या प्रजाती नामशेश व्हायला लागल्या आहेत. उदा. घोरपड,सरडे,साळीदंर हे प्राणी खूप प्रमाणात पुर्वी खेडेगावात दिसत होते. परंतू हे प्राणी आता खूप कमी प्रमाणात दिसतात.सरपटणाऱ्या अनेक प्राण्याच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत.झाडांची संख्या कमी झाल्यामुळे पक्षी सुदधा आपणास पहावयाला मिळत नाहीत. चिमणी, पोपट,कावळे, गिधड, घुबड या पक्षाची संख्या खूप कमी झाली आहे. झाडाची व जंगलाची संख्या कमी झाल्यामूळे पृथ्वीवरचे तापमान वाढत चालले आहे.याचा प्रत्यय आपणाला येत्या दोन ते तीन वर्षाच्या उन्हाळयात येत आहे.