कराड शहरातील तिसरी टोळी तडीपार
गुन्हेगारी रोखण्यासाठी कराड शहर पोलिसांची धडक कारवाई
Published:Mar 05, 2021 02:29 PM | Updated:Mar 05, 2021 02:29 PM
News By : Muktagiri Web Team
कराड ः कराड शहरातील सोळवंडे टोळी, झेंडे टोळी तडीपार केल्यानंतर आता पोलिसांनी मलकापूर भागातील जुनेद शेख व अमीर शेख यांच्या टोळीचे चार सदस्यांची तिसरी टोळी सातारा जिल्ह्यातून व सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा कडेगाव तालुक्यातून दोन वर्षा करिता हद्दपार केली. आहे. अशिष पडळकर, अनिकेत शेलार, इंद्रजीत पवार व सुदर्शन चोरगे अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. मलकापूर भागातील जुनेद शेख व अमीर शेख हे दोन्ही रेकॉर्ड वरील गुन्हेगार सध्या जेलमध्ये आहे. नमूद गुन्हेगारांची गुन्हेगारी टोळी अशिष पडळकर, अनिकेत शेलार, इंद्रजीत पवार व सुदर्शन चोरगे हे चालवत होते. नशहरामध्ये दहशत निर्माण करून आपली गुन्हेगारी वृत्ती चालू ठेवलेले असल्याने सदरची टोळी तडीपार होण्याकरता कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हद्दपार प्राधिकार तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सुनावणी घेऊन अशिष पडळकर, अनिकेत शेलार, इंद्रजीत पवार व सुदर्शन चोरगे यांना सातारा जिल्ह्यातुन व सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केलेले आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोली निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवालदार नितीन येळवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल गाडे, विनोद कदम, पोलिस नाईक तानाजी शिंदे, पोलीस नाईक संजय जाधव या पथकाने कामकाज पाहिले आहे.