कडक निर्बंध पाळू; पण दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या

फलटण शहरातील व्यावसायिकांची निवेदनाद्वारे मागणी
Published:4 y 9 m 1 d 20 hrs 40 min 24 sec ago | Updated:4 y 9 m 1 d 20 hrs 40 min 24 sec ago
News By : Muktagiri Web Team
कडक निर्बंध पाळू; पण दुकाने सुरू करण्यास परवानगी द्या

शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे आम्ही व्यवसाय करू व वेळोवेळी दिलेल्या कडक निर्बंधाचेही पालन करण्यास तयार आहोत, तरी फलटण शहरातील व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी अथवा एक दिवसाआड व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे फलटण येथील व्यापारी व व्यावसायिक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.