घरफोडी, चोऱ्यासारख्या गंभीर गुन्ह्यात 9 वर्षे फरार असलेल्या आरोपीस अटक
News By : Muktagiri Web Team
मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि. 3 ः सातारा, सांगली जिल्ह्यात घरफोडी, चोऱ्या सारखे गंभीर गुन्हे करून 9 वर्षे फरार असणाऱ्या आरोपीस कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शनिवारी कराड परिसरातून अटक केली. दिपक महादेव थोरात (मूळ रा. वाकुर्डे बुद्रुक, ता. शिराळा, जि. सांगली, सध्या रा. राम मंदिरासमोर करवडी, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत सन 2015 साली विद्यानगर येथील संजय तुकाराम देसाई यांच्या घरात दोन अज्ञात व्यक्तीनी कळकाच्या काठीस सुफली बांधून घरातील मोबाईल फोन मुद्दाम लबाडीने चोरुन नेला होता. याबाबत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आनंदा भिकाजी थोरात (रा. वाकुर्डे, ता. शिराळा जि. सांगली व दिपक महादेव थोरात यांचे विरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सदर गुन्ह्यात आरोपीत दिपक महादेव थोरात हा गुन्हा केल्यापासून सुमारे 9 वर्षे पोलीसांना गुंगारा देत होता. सदर गुन्ह्याचा तत्कालीन सहाय्यक फौजदार एस. आर. जाधव यांनी तपास करुन आरोपी दीपक थोरात व यातील अटक आरोपी आनंदा थोरात यांना फरारी दाखवुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलेले होते. याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी फरार आरोपीस पकडण्याच्या सूचना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. पोलिसांनी तपासचक्र फिरवत माहीतीच्या आधारे घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी दिपक थोरात हा कराड परीसरात आल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व डीबी टीमला कारवाई करणेच्या सुचना केल्या. त्याप्रमाणे शोध करीत असताना पोलीस अंमलदार आनंदा जाधव यांनी पाठलाग करुन त्यांस शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने गुन्हा केलेची कबुली दिली असुन त्यांस अटक करणेत कराड शहर डी. बी. पथकाने यश मिळविलेले आहे. पुढील कार्यवाही सहा. पोलीस उपनिरीक्षक संजय देवकुळे हे करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षकआंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पतंग पाटील, कराड शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, पोलीस अंमलदार विकास सपकाळ, शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, आनंदा जाधव, महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली.