साखर निर्यातीमध्ये ‘सह्याद्रि’चे नांव देशपातळीवर
‘सह्याद्रि’स नॅशनल फेडरेशनकडून देशपातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर
Published:Jan 28, 2021 12:50 PM | Updated:Jan 28, 2021 12:50 PM
News By : Muktagiri Web Team
देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणार्या, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅयटरीज्, नवी दिल्ली या संस्थेकडून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास जाहिर झाला आहे.
देशाला परकीय चलन उपलब्ध होवून, अर्थ व्यवस्था मजबुत होण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात करणेबाबत जाहिर केलेल्या योजनेअंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने, कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गर्शनाखाली 5 लाख 80 हजार 730 यिवंटल इतयया मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात केलेली आहे. हि साखर निर्यात सन 2019-20 सालाच्या साखर उत्पादनाच्या 42 टयके आहे. त्याबद्दल नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅयटरीज्, नवी दिल्ली या संस्थेने कारखान्यास सदरचा पुरस्कार जाहिर केला आहे. या पुरस्काराचे वितरण माहे मार्च, 2021 मध्ये मुख्य अतिथींच्या हस्ते ‘साखर उद्योगासमोरील जागतिक आव्हाने व भारतातील साखर उद्योगाच्या नावीन्यपूर्ण वाढीस दृष्टीकोन’ या विषयावरील परिषदेत समारंभपुर्वक करण्यात येणार आहे. कारखान्यास सदरचा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन मा.नामदार बाळासाहेब पाटील व संचालक मंडळाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.