पाटणमध्ये उरुसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
खानखा हजरत ख्वाजा गरीब नवाज बंदानवाज गेसूदराज व संजीवन हाँस्पिटल, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण (रामापूर) याठिकाणी आज भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. पुनेवाले चिश्ती हाऊस, सातारा जि बँक च्या मागे हे शिबीर होणार आहे. पाटण सह परिसरातील नागरिकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घ्यावा अशी माहिती पीर हजरत शेख मोहम्मद खलील चिश्ती यांनी पत्रकाव्दारे दिली. पाटण मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असणारा दर्गा आहे. प्रतिवर्षी या दर्ग्याचा उरुस मोठ्या प्रमाणात होत असतो. गेली अनेक वर्ष पुना वाले चिश्ती कुटुंबिय उरुसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेत आले आहेत. या वर्षी उरुसाच्या निमित्ताने कराड व पुणे याठिकाणच्या तज्ञ डाँक्टरांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरामध्ये कराड चे सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डाँ. विजयसिंह पाटील, डाँ. भाग्यश्री पाटील नेत्ररोग तज्ञ, डाँ. योगिता पाटील स्री रोगतज्ञ, डाँ. दिलीप सोळंकी जनरल मेडिसीन, डाँ. सुहास पाटील अस्थिरोग तज्ञ, डाँ. दिपाली चव्हाण जनरल फिजिशियन, डाँ. अजिक्य जाडकर दंतवैद्य, डाँ. प्रल्हाद शिंदे आयुर्वेदाचार्य, डाँ. पद्मराज रानबगळे आयुर्वेदाचार्य, डाँ. छाया शिंदे त्वचारोग/आयुर्वेदाचार्य हे तज्ञ डाँक्टर शिबीरामध्ये उपस्थित राहणार आहेत. सदर शिबीरामध्ये, जनरल तपासणी, ह्रदयरोग, नेत्ररोग, त्वचारोग, अस्थिरोग, स्रीरोग व वंध्यत्व, दंत तपासणी व तोंडाच्या कर्करोगाची चाचणी होणार आहे. सर्व डाँक्टर रुग्णांची तपासणी करत, निदान, सल्ला, मार्गदर्शक केले जाईल. तसेच मोफत औषधे दिली जातील. आरोग्य शिबीरामध्ये " देसाई लँबेरोटरी" मार्फत सर्व रुटिंग चेकिंग वरती तीस टक्के सवलत देण्यात येणार आहे. जास्तीतजास्त लोकांनी या शिबीरामध्ये येऊन आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी असं आवाहन पुणेवाले उरुस कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.