महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं अत्यंत महत्त्वाची माहिती देत दहावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. 2 जून 2023 रोजी दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असल्याची माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे. निकाल ऑनलाईन जाहीर होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होईल. राज्यात 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलीय. तेव्हा या सर्वच विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक आणि शिक्षकांना निकालाबाबत उत्सुकता आहे. दहावीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahresult.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर होमपेजवर असणाऱ्या Maharashtra SSC result च्या लिंकवर क्लिक करावं. तिथं तुमचा हॉलतिकीट क्रमांक टाका. आवश्यक तपशील विचारल्यास त्याचीही माहिती द्या. पुढच्या क्षणालाच तुमच्यासमोर निकाल Open झालेला असेल. पुढे निकालातील सर्व माहिती, गुण वगैरे तपासून पाहा आणि ही माहिती डाऊनलोड करा. गरज वाटल्यास तुम्ही या माहितीची प्रिंटही काढू शकता.