भूकंपाच्या धक्क्याने कोयना परिसर हादरला
मंगळवारी सकाळी 3.3 रिश्टर स्केलचा धक्का
Published:3 y 5 m 21 hrs 8 min 4 sec ago | Updated:3 y 5 m 21 hrs 8 min 4 sec ago
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटण ः कोयना परिसर मंगळवारी सकाळी 9.47 च्या सुमारास भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल एवढी असून भूकंपाचा केंद्र बिंदू धरणापासून 9 किलोमीटर अंतरावर काडोली गावच्या पश्चिमेस अ असून खोली 7 किमी आहे. भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित, वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.