मातीवाले आणखी किती जीव घेणार?
महसूल प्रशासनाचे पोलिसांकडे बोट
Published:Apr 02, 2023 07:41 PM | Updated:Apr 02, 2023 07:41 PM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
माती माफियांचा उच्छाद सर्वसामान्य जनतेचा जीव घेऊन थांबणार का? एक नाही दोन नाही तब्बल चार अपघात या माती माफियांकडून घडले आहेत. दोघांचे पाय मोडून, काळोली बस थांबा कोलमडून टाकण्यात माती वाहतूक करणार्या डंपरवाल्यांना चांगले जमले आहे. महसूल प्रशासन माती व्यावसायिकांना पाठीशी घालत आहेत. अपघात घडला की पोलिस प्रशासन आणि परवानग्या द्यायला महसूल प्रशासन. आता पर्यंत चे अपघात निव्वळ पाठीशी घालणे या कारणांमुळे वाढत गेले आहेत. काळोली चा कार्नर आणि अपघात केंद्र याचं समीकरण आता पक्क बसले आहे. माती उत्खनन परवानगी देणारे तहसीलदार अपघातानंतर सरळ आपल हात झटकून मोकळे होतात. घटनास्थळी घटना घडल्यानंतर बराचं वेळ पोलिस पोहचले नव्हते किंबहुना महसूल तहसिलदार यांना सांगितले नंतर पोलिस एफ आर आय करतील . ते करतील कारवाई अशी उत्तर आली. मग्रूर आणि उद्धट माती व्यावसायिक किती दिवस मोकाट राहतील.