वडूज येथे शासनाचे नियम व अटींचे पालन करीत शिवजयंती सोहळा सर्व प्रकारची काळजी घेत संपन्न झाला. येथील बॉक्सर ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करीत येणारे संकट दूर होऊन ही प्रजा सुखी व्हावी, यासाठी नतमस्तक झाले. सकाळी 11 वाजता पारंपरिक पद्धतीने वाकेश्वर येथील संतोष संभाजी फडतरे यांच्या ‘सर्जा राजाची’च्या बैलजोडी सजवून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली. जय जिजाऊ जय शिवराय, असा जयघोष करीत शहरातून भव्य मिरवणूक
वडूज : वडूज येथे शासनाचे नियम व अटींचे पालन करीत शिवजयंती सोहळा सर्व प्रकारची काळजी घेत संपन्न झाला. येथील बॉक्सर ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करीत येणारे संकट दूर होऊन ही प्रजा सुखी व्हावी, यासाठी नतमस्तक झाले.
सकाळी 11 वाजता पारंपरिक पद्धतीने वाकेश्वर येथील संतोष संभाजी फडतरे यांच्या ‘सर्जा राजाची’च्या बैलजोडी सजवून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली. जय जिजाऊ जय शिवराय, असा जयघोष करीत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तद्नंतर सायंकाळी मुख्य ठिकाणी ग्रुपच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला.
तसेच गतवर्षी झालेल्या गडकिल्ल्यांच्या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना, त्याचबरोबर भव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना ग्रुपच्या वतीने प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 100 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. यावर्षीचे खास आकर्षण ठरले, ते म्हणजे किल्ले राजगड येथील साकारलेली प्रतिकृती. सदर किल्ला हा नागपूर येथील कलाकार विशाल देवकर यांच्या संकल्पनेतून साकारला गेला.
भगवे वादळ ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, नगरसेवक शहाजी गोडसे, विजय शिंदे, महेश गोडसे आदींसह मान्यवरांनी शिवप्रतिमेस अभिवादन केले. तर वाकेश्वर येथे किल्ले रायगडावरून आणलेल्या शिवज्योतीचे उत्साहात स्वागत व मिरवणूक काढण्यात आली.