वरकुटे मलवडी-शिरताव रस्त्याच्यासाठी मार्च बजेटमध्ये आणखी 5 कोटी निधी मंजूर : अनिलभाऊ देसाई
News By : Muktagiri Web Team
म्हसवड, दि. 10 ः माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी - शिरताव रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थ व वाहनाधारकांकडून रस्ता दुरूस्तीची वारंवार मागणी होत होती याची दखल घेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व भाजपा सहकार आघाडीचे महाराष्ट्र राज्य सहसंयोजक अनिलभाऊ देसाई यांनी तातडीने रस्ता दुरूस्तीसाठी पाठपुरवा केला होता. डिसेंबर पुरवणी बजेट मध्ये 5 कोटी निधी मंजूर केला होता उर्वरित काम पूर्ण होणेसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना. प्रविण दरेकर, व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून भाजप सहकार आघाडीचे सहसंयोजक अनिलभाऊ देसाई यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे विधानपरिषद गट नेते आ. प्रवीण दरेकर यांचे मार्फत मागणी केली होती या पाठपुराव्यास यश मिळून मार्च अर्थसंकल्पात वरकुटे मलवडी - शिरताव रस्त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती अनिभाऊ देसाई यांनी दिली. याबाबत माहिती देताना देसाई म्हणाले. वरकुटे मलवडी-शिरताव हा रस्ता अत्यंत खराब झाल होता. या रस्त्यावरून लोकांना प्रवास करणे अत्यंत अडचणीचे ठरत होते. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती. दळणवळणाच्या दृष्टीने गावातील रस्ते सुस्थितीत असणे अत्यंत गरजेचे आहे. वरकुटे मलवडी - शिरताव रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती त्यामुळे वाहतूकीला सारखा अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे ग्रामस्थांची तातडीने रास्ता दुरुस्त करावा मागणी होती. बजेट मध्ये मंजुरी मिळाली असून लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण शिरताव ते शेणवाडी रस्त्यांच्या कामाला सुरूवात होणार आहे. निधी मंजूर झाल्यामुळे रस्त्याची समस्या दूर होणार आहे. जनतेच्या हितासाठी तातडीने पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.पहिले 5 कोटी चे टेंडर निघाले असून उर्वरित 5 कोटी कामाचे टेंडर निघून काम सुरु होणार आहे .सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ना. प्रविण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,यांचे कडे पत्राद्वारे केलेल्या मागणीमुळे हा निधी मंजूर झाल्याचेही व शिरताव ते शेनवाडी रास्ता रुंदीकरण डांबरीकरण काम होणार असलेच अनिल देसाई यांनी सांगितले.