कृष्णा कारखाना ऊसदरात मागे राहणार नाही : डॉ.सुरेश भोसले
News By : कराड | संदीप चेणगे
यंदा साखरेला बाजारपेठेत चांगली मागणी राहून दरही चांगला मिळेल अशी अपेक्षा आहे. साहजिकच ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनाही चांगला ऊसदर मिळणार आहे. त्यामुळे कृष्णा कारखाना दरात मागे राहणार नाही, अशी ग्वाही य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 63 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून 63 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला श्री. पृथ्वीराज भोसले, विनायक भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, वैभव जाखले, माजी संचालक पांडुरंग होनमाने, गिरीश पाटील, राजारामबापू कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील, शिवाजी थोरात, संपतराव थोरात, व्ही. के. मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. चेअरमन डॉ. भोसले पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना लवकर ऊसतोडी मिळाव्यात म्हणून आमचे संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. आता तर आपण कारखान्याचे आधुनिकीकरण केले असून, या हंगामात 10 हजार मे. टन प्रतिदिन गाळप क्षमतेने कारखाना चालल्यास यंदाच्या हंगामात 15 लाख मे. टन ऊसगाळपाचे उद्दिष्ट साध्य होण्यात कुठलीही अडचण येणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. उपाध्यक्ष जगदीश जगताप म्हणाले, कमीत कमी दिवसांत जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. यावर्षी 10 हजार प्रतिदिन गाळप क्षमतेने कारखाना चालणार असून ही आनंदाची बाब आहे. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी म्हणाले, राज्यात अनेक कारखान्यांना ऊसतोडणी यंत्रणा अपुरी आहे. मात्र कृष्णा कारखान्याची ऊसतोडणी यंत्रणा सुसज्ज आहे. यावर्षी निश्चितपणे चांगले गाळप करून 15 लाख मे. टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपला नोंदविलेला ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. प्रारंभी उपाध्यक्ष जगदीश जगताप व त्यांच्या पत्नी सौ. विद्या जगताप यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी राजारामबापू बँकेचे संचालक संग्राम पाटील, जयवंतराव भोसले सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, कृष्णा बँकेचे भगवानराव जाधव, शंकरराव पाटील, ब्रह्मानंद पाटील, तानाजी मोरे, संजय पवार, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, गजेंद्र पाटील, वसंतराव पवार, वसंतराव साळुंखे, सर्जेराव पाटील, प्रमोद पाटील, संदीप यादव, जयवंत नांगरे, जयवंत कणसे, एम के कापूरकर, बाळासाहेब पाटील, सेक्रेटरी मुकेश पवार, टेक्निकल को-ऑर्डीनेटर एस. डी. कुलकर्णी, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार कंत्राटदार, व्यापारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी, कारखाना अधिकारी, कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती.