रामराजेंच्या वयाचे भान राखून मी गप्प; अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा सुरवडीतील पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप
Published:Mar 21, 2021 10:30 AM | Updated:Mar 21, 2021 10:30 AM
News By : Muktagiri Web Team
रामराजेंच्या वयाचे भान राखून मी गप्प; अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती

‘गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत मोठमोठी पदे मिळूनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण तालुक्यात कोणतेही भरीव विकासकाम करता आलेले नाही, विकासकामाचा त्यांनी नुसता दिखावा केला असून, आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून त्याबदल्यात पदे भोगण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. त्यांच्या वयाचे भान राखून मी गप्प आहे अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती,’ असा घणाघाती आरोप खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.