पोत्यात बांधलेल्या स्थितीत नदीपात्रात आढळला मृतदेह
कराड तालुक्यातील मालखेड येथील घटना; घातपाताचा संशय
Published:Nov 17, 2021 10:15 AM | Updated:Nov 17, 2021 10:15 AM
News By : Muktagiri Web Team
वाठार : मालखेड येथे कृष्णा नदीपात्रामध्ये पोत्यात बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह पुरुषाचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतदेहाचे अनेक तुकडे असल्यामुळे पोलिसांना ओळख पटवणे अवघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील मालखेड येथे बुधवारी काही मासेमारी करणारे नदीपात्रात होते. त्यावेळी त्यांना एक पोते नदीपात्रात आढळले.संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. अपर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, उपअधिक्षक रणजीत पाटील, सहाय्यक निरिक्षक रेखा दुधभाते, भरत पाटील, एसआय जाधव, धनंजय कोळी, सज्जन जगताप, विजय म्हेत्रे, शशिकांत घाडगे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो पुर्णतः कुजलेल्या अवस्थेत होता. कपड्यासह इतर काही बाबींवरून मृृतदेहाची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू होते. हा मृत्यू संशयास्पद असून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.