‘कोव्हिड-19 या आजाराचा फैलाव खूप झपाट्याने होत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत व काही रुग्णांना जर ऑक्सिजन देण्याची गरज भासली तर तेवढे ऑक्सिजनचे बेड आपल्या फलटणमध्ये उपलब्ध नाहीत.
फलटण : ‘कोव्हिड-19 या आजाराचा फैलाव खूप झपाट्याने होत असून, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत व काही रुग्णांना जर ऑक्सिजन देण्याची गरज भासली तर तेवढे ऑक्सिजनचे बेड आपल्या फलटणमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनचा बेड उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे. भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून फलटण शहरामध्ये 500 ऑक्सिजनयुक्त बेड उपलब्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे,’ असेे प्रतिपादन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
काटकर यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, फलटण शहरातील मोठे उद्योगपती, बिल्डर, व्यापारी व सधन व्यक्तींनी सदरचे ऑक्सिजनयुक्त बेड मिळविण्याकामी सढळ हाताने मदत करावी. आपल्या या मदतीमुळे अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्राण वाचणार असून, या ऑक्सिजनमुळे त्यांना जीवनदान मिळणार आहे. व आपली मदत कामालाही येणार असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.