‘शासनाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असून, त्या योजनांचा लाभ घेऊन बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन निमसोड एकता महिला संघाच्या अध्यक्षा अॅड. अनुराधा देशमुख यांनी केले.
निमसोड : ‘शासनाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असून, त्या योजनांचा लाभ घेऊन बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन निमसोड एकता महिला संघाच्या अध्यक्षा अॅड. अनुराधा देशमुख यांनी केले.
निमसोड महिला ग्रामसंघ व माणदेशी महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिध्दनाथ मंदिरात बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी माणदेशी फाउंडेशनमार्फत महिलांना कॅल्शियम व्हॅटमीन, रक्तवाढ, अंगदुखी ताप यासारख्या औषधांचे तसेच मास्कचे वाटप मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले.
अॅड. देशमुख पुढे म्हणाल्या, ‘ग्रामसंघामार्फत लहान-मोठ्या बचत गटांना कर्ज वाटप करून महिलांनी उद्योग व्यवसाय सुरू केले असून, इथून पुढच्या काळात शासनाच्या अनेक योजनांचा लाभ आपण महिलांना मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.’
या प्रसंगी बचत गटाच्या माध्यमातून लहान उद्योग व्यवसाय करणार्या महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास अॅड. अनुराधा देशमुख, वैशाली माने, नीता देशमुख, लीना निकाळजे, जमिला तांबोळी, लता माने, माणदेशी फाउंडेशनच्या राजश्री जाधव, कोळपे, इंगळे व इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.