खटाव तालुक्यातील शेनवडी गावात वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावच्या युवकांनी आयसोलेशन कक्षाची निर्मिती केली असून, या आयसोलेशन कक्षाचे उद्घाटन चोराडे गावचे आरोग्य अधिकारी डॉ. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील शेनवडी गावात वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावच्या युवकांनी आयसोलेशन कक्षाची निर्मिती केली असून, या आयसोलेशन कक्षाचे उद्घाटन चोराडे गावचे आरोग्य अधिकारी डॉ. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
या आयसोलेशन कक्षामुळे रुग्णांची होणारी फरपट कमी होईल व प्रशासनाचा थोडा का होईना पण शेनवडी गावापुरता तरी ताण कमी होईल. हे लक्षात घेऊन आयसोलेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आरोग्य विभागावर प्रचंड असा ताण आलेला आहे, रुग्णांना मूलभूत सेवा देणे आता आरोग्य विभागाला शक्य होत नाही. कारण, रुग्णांची संख्याच खूप वाढली आहे.
यासाठी शेनवडी गावच्या युवकांनी लोकवर्गणीतून आयसोलेशन कक्षाची निर्मिती केली आहे. या कक्षात 22 रुग्णांची सोय होईल, अशा प्रकारे सोय करण्यात आली आहे. यामध्ये दोन ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. पुरुषांसाठी व महिलांसाठी वेगवेगळ्या सुविधाही करण्यात आल्या आहेत. येथील रुग्णांवर 24 तास लक्ष ठेवण्यासाठी आशा सेविका डोळ्यात तेल घालून काम करत आहेत.
आयसोलेशन कक्षाच्या उभारणीसाठी आनंदा घाडगे, रवींद्र घोडके, किरण कोकाटे, बबन माळी, ज्ञानेश्वर कोकाटे, सुभाष कोकाटे, अतुल दबडे, सतीश कोकाटे, जहांगीर तांबोळी, सागर जाधव, संजय सुतार, विश्वास चव्हाण, शहाजी कोकाटे, मारुती घोडके, ज्ञानेश्वर जाधव, दीपक कोकाटे, सचिन सातपुते, सदाशिव कोकाटे, अधिक वाघमारे, आबासो रसाळ व इतर सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.