29 वर्षानंतर माजी विद्यार्थी रमले आठवणीतील शाळेत
News By : कराड | संदीप चेणगे
शाळेतील आठवणींना उजाळा देत खाजेवाडी ता. साताराच्या महाराष्ट्र हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. सन1992-93 च्या बॅचच्या इयत्ता 10 वीतील विद्यार्थ्यांची तब्बल 29 वर्षानंतर भेट झाल्यामुळे माजी विद्यार्थी रमले आठवणतील शाळेत. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांनी जपले ऋृणानुबंध.
महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक कांबळे अध्यक्षस्थानी होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य रामुगडे सर, कदम सर, यादव सर, साळुंखे सर, गायकवाड सर, मांजरे सर, अशोक घाडगे यांच्यासह आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेस टिव्ही संच भेट देण्यात आला.
मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहर्यावर दिसत होता. तत्कालीन दहावीच्या मित्र व मैत्रीणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. या सन्ेह मेळाव्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि अनेकांना गहिवरून आले. गतकाळातील जुन्या आठवणींना उजाळा देत मेळाव्या गुरूजनांच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कदम सर, गायकवाड सर, यादव सर, साळुंखे सर, वैशाली घाडगे जाधव, विजय घोरपडे आदींनी मनोगत वक्त केले.
या मेळाव्याच्या अयोजन विजय घोरपडे यांनी केल्याने एक नवीन दिशा मिळणार आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थीनी मदत करावी. यामुळे शिक्षण क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे काम करता येईल, अशी अपेक्षा माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
अंजनकुमार घाडगे यांनी सुत्रसंचालन केले. दादासाहेब गवळी यांनी प्रास्ताविक केले. शकुंतला घाडगे-कणसे यांनी आभार मानले.