मलवडी येथील 98 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

श्री सेवागिरी कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
Published:May 02, 2021 05:03 PM | Updated:May 02, 2021 05:03 PM
News By : Muktagiri Web Team
मलवडी येथील 98 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

माण तालुक्यातील मलवडी येथील गणपत जगदाळे या 98 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात करून केवळ दहा दिवसांतच ठणठणीत बरे होऊन घरीही परतले. निढळ येथील श्री सेवागिरी कोविड केअर सेंटर मधील रेमडेसिवीर इंजेक्शन न वापरताही उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.