जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यात खटाव तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या गावोगावी विविध उपाययोजना करून देखील रुग्ण आटोक्यात येण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने खटाव तालुका कोरोनाचा हॉट स्पाट बनतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यत: भोसरे, खटाव, वडूज, पुसेगाव, औंध आदी गावांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना थोपवण्यास पुढाकार घेतला पाहिजे.
भोसरे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यात खटाव तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या गावोगावी विविध उपाययोजना करून देखील रुग्ण आटोक्यात येण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने खटाव तालुका कोरोनाचा हॉट स्पाट बनतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यत: भोसरे, खटाव, वडूज, पुसेगाव, औंध आदी गावांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना थोपवण्यास पुढाकार घेतला पाहिजे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे खटाव तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या खटाव तालुक्यात गावोगावी ठिकठिकणी लसीकरण सुरू आहे. मात्र, लसीकरणाबाबतही लोकांमध्ये विविध शंका निर्माण होत आहेत. तरीही गाव पातळीवर सर्वांनी लसीकरण करावे, यासाठी प्रशासनातर्फे जनजागृती देखील केली जात आहे.
खटाव तालुक्यातील मागच्या दोन दिवसांचा रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा आकडा पाहिला तर चिंताजनक आणि विचार करायला लावणार आहे. 17 एप्रिलला खटाव तालुक्यात 218 पॉझिटिव्ह, 18 एप्रिलला 96, तर 19 एप्रिलला 121 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हे सर्व आकडे पाहता खटाव तालुक्यातील वाढता आकडा हा चितांजनक आहे.
त्यामुळे सध्या नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतीमार्फत केले जात आहे. तसेच कोरोनाची लक्षणे असणार्या व्यक्तींना होम क्वारंटाईन देखील केले जात आहे. तसेच गावात सॅनिटायझरची फवारणी करून गावे सॅनिटाइज देखील केली जात आहेत.