कराड ः पळून जाऊन लग्न करायला मदत केल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना राजमाची गावच्या हद्दीत सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जर्नादन महादेव गुरव (वय 49, रा. राजमाची ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर विकास पाडळे, बाबासाहेब पवार, विनायक चंदुगडे सर्व (रा. हजारमाची ता. कराड) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.