म्हासुर्णेकर राबवणार ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव मंडळ व ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय 
Published:Aug 18, 2020 01:30 PM | Updated:Aug 18, 2020 01:30 PM
News By : Muktagiri Web Team
म्हासुर्णेकर राबवणार ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम

म्हासुर्णे, ता. खटाव येथे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना सर्व सार्वजनिक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने राबवण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोनाचे संकट तालुक्यातही गडद होत आहे. गावोगावी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागल्यामुळे गणेशोत्सव काळात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवून आधीच कोरोनाच्या लढाईत सर्व पातळीवर व्यस्त असणार्‍या प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत म्हासुर्णे गावाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.