सोनवडी : तारुण्यात असलेली उर्मी आणि ऊर्जा याचे रूपांतर राष्ट्रभक्तीत करायची असेल तर व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा आपले हितरक्षण करते.स्वतः वरचे व देशाचे प्रेम ही भक्ती जोपासायची असेल तर व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती होय हे लक्षात घेणे असे मत परिवर्तन व्यसनमुक्ती संस्थेचे प्रकल्प समन्वयक व सामाजिक कार्यकर्ते किशोर काळोखे यांनी व्यक्त केले.

हनुमानगिरी ज्युनिअर कॉलेज पुसेगाव आणि निर्धार गटाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्यसनमुक्ती हीच राष्ट्रभक्ती या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
यावेळी प्रा. डूबल यांची उपस्थिती होती. काळोखे पुढे म्हणाले की, व्यसनाला नकार देण्याची कौशल्य आत्मसात करायला हवीत, याच वयात समवयस्क मित्र आणि मैत्रिणींनाचा दबाव येतो तसेच ऑनलाईन मूळे आपल्या मनावर देखील प्रभाव असतो. जे पाहतो त्याचं तात्काळ अनुकरण करतो . आंधळ प्रेम आणि आंधळी श्रद्धा धोकादायक असते . आपण प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहता आली पाहिजे, सजग रहायला हवे आणि दूत म्हणून आपण कार्य करायला हवे. यावयात केवळ मोबाईल च्या गेम उपयोगाच्या नसून आभासी दुनियेत न राहता ,वास्तव जगणं अनुभवायला हवे तसेच मैदानी खेळ खेळले पाहिजेत. कोणतंही व्यसन वाईटच असते . दारू, गुटखा,सिगारेट आणि तंबाखू यामुळे शरीर आणि मन दुबळे बनते. तंदुरुस्ती हे ध्येय असावे व मदत करणे हा आत्मसन्मान असावा, महाविद्यालयात विश्ववाला सामोरे जाणारा आत्मविश्वास वाढवा म्हणून आपण येतो हे मनात पक्के ठरवणे उज्वल भविष्याकरिता उपयुक्त आहे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा शिंदे, प्रा सौ देसाई,प्रा कवी,प्रा घनवट,प्रा कु जगताप यांनी