‘आपल्या देशामध्ये कोरोनाचे संकट भयंकर आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. अशा वेळी प्रथम फळीतील योद्धे म्हणून देशातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच आरोग्य कर्मचार्यांनी फार मोलाचे कार्य केले. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, त्याचा आपल्या देशातील सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याची इतर कोणाशी तुलना करता येणार नाही,’ असे प्रतिपादन कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांनी केले.
कोरेगाव : ‘आपल्या देशामध्ये कोरोनाचे संकट भयंकर आक्राळविक्राळ रूप धारण करत आहे. अशा वेळी प्रथम फळीतील योद्धे म्हणून देशातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस तसेच आरोग्य कर्मचार्यांनी फार मोलाचे कार्य केले. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला, त्याचा आपल्या देशातील सर्वांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्य उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याची इतर कोणाशी तुलना करता येणार नाही,’ असे प्रतिपादन कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे यांनी केले.
कोरेगाव शहर विकास मंचचे अध्यक्ष व कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे विद्यमान संचालक किशोर बर्गे यांच्या कोरेगाव ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्रात मास्क, सॅनिटायझर व आरोग्य रक्षक साहित्य भेट देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
बर्गे पुढे म्हणाले, ‘कोरेगाव तालुक्यातूनही कोरोना हद्दपार करण्यासाठी कोरेगाव ग्रामीण रुग्णालयानेही अतिशय प्रभावी काम केले आहे. यामध्ये डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजन काळोखे, डॉ. नीलेश बर्गे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. समाजात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आहेत म्हणूनच आपले आरोग्य नीट राहू शकते. कोरोनाच्या संकट काळात जीवाची पर्वा न करता समाजाचे आरोग्य जपण्याचे काम आपली आरोग्य यंत्रणा करीत आली. परंतु कोरोना पुन्हा वाढीस लागल्याने आरोग्य विभागातील यंत्रणेवरच समाजाची मोठी जबाबदारी वाढली आहे.’
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. राजन काळोखे, डॉ. नीलेश बर्गे, तसेच आरोग्य सेविका थोरात, कुंभार, कर्पे, योगिता गोसावी, रामचंद्र बोतालजी, विनोद गोरे, राजू बागवान व इतर मान्यवर उपस्थित होते.