कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवावी

स्वप्नील घोंगडे यांचे आवाहन; वाठार स्टेशन येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक
Published:Aug 20, 2020 11:41 AM | Updated:Aug 20, 2020 11:41 AM
News By : Muktagiri Web Team
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबवावी

‘सर्व गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर, सामाजिक जाणिवेतून आदर्श निर्माण करत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवावी. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार व शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा,’ असे आवाहन वाठार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांनी केले.