पाटण तालुक्यात दोघांवर गोळीबार; दोघे गंभीर
घटनेमुळे मोरणा विभागात खळबळ
Published:Mar 19, 2023 09:42 PM | Updated:Mar 19, 2023 09:57 PM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटण ः पाटण तालुक्यातील धक्कादायक घटना समोर येत असून रविवारी सायंकाळी गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. मोरणा विभागात ही घटना घडली असून याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलीस पोहोचले आहेत. या गोळीबारामध्ये एकाने दोघांवर गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. याचबरोबर संबंधीताने आजूबाजूलाही मोठ्या प्रमाणात गोळीबार केल्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. व्यक्तीगत कारणातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुरेघर धरणा लगतच ही घटना घडली आहे.