पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतली भेट
News By : Muktagiri Web Team
दिल्ली येथे माढा मतदार संघाचे पाणीदार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सपत्नीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतदार संघातील विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर उपस्थित होत्या.
फलटण : दिल्ली येथे माढा मतदार संघाचे पाणीदार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सपत्नीक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मतदार संघातील विविध प्रश्नाच्या संदर्भामध्ये पंतप्रधान कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर उपस्थित होत्या.
यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदार संघातील कृष्णा-भीमा स्थिरीकरण, फलटण-पंढरपूर रेल्वे, नीरा देवधर प्रकल्प, गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना, (जिहे-कटापूर) माढा मतदार संघातील तरुण, बेरोजगार युवकांना व्यवसायाच्या दृष्टीने मोठा प्रकल्प येण्याबाबत चर्चा केली.
यावेळी त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेबाबतची संपूर्ण माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. या प्रकल्पाचा पश्चिम महाराष्ट्रातील 22 दुष्काळी जिल्ह्यांमध्ये त्याचा लाभ होणार आहे. कृष्णा नदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कर्नाटकला न जाता ते अडवल्यास सिंचनाच्या व पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल व दरवर्षी येणारी पूरग्रस्त परिस्थिती सुद्धा यामुळे निर्माण होणार नाही. 12 वर्षांपूर्वी ही योजना तयार करण्यात आलेली आहे.परंतु प्रत्यक्षामध्ये ही योजना 2023 मध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होती. ही योजना पूर्ण झाल्यास 110 टीएमसी पाणी महाराष्ट्राला जादा मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण या दुष्काळी भागाबरोबर सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा या शहरांना पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली निघेल. तसेच ही योजना पूर्ण होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जनता व कर्नाटक सरकार हे दोन्ही अनुकूल आहेत.
परंतु, हा प्रकल्प मोठ्या असल्या कारणाने आत्ताचे असणारे सरकार हे खूप गांभीर्याने घेत नाही, आपण यामध्ये लक्ष घालून या प्रकल्पास जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न केल्यास या मतदारसंघातील जनता आपली ऋणी राहील, असे खा. रणजितसिंह यांनी सांगितले. तसेच ब्रिटिश काळापासून फलटण-पंढरपूर रेल्वेच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे. याबाबत ब्रिटिशांनी रेल्वेचे सर्वेक्षणाचे काम सुद्धा पूर्ण केले आहे. पंढरपूर हे महाराष्ट्रातील हे प्रसिद्ध देवस्थान आहे, त्या देवस्थानाकडे करोडो श्रद्धाळू भाविक दरवर्षी आषाढी व कार्तिकी यात्रेसाठी येतात. फलटणपर्यंत रेल्वेचे काम पूर्ण झालेले आहे.
पुढील फलटण ते पंढरपूर रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यास तीर्थ क्षेत्राबरोबरच या भागाचा आर्थिक विकास खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल तसेच बेरोजगारांचा प्रश्न सुद्धा बर्यापैकी मार्गी लागेल. या कामाच्या बाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 2018 या वर्षामध्ये 108 किलोमीटर रेल्वे लाईनच्या संदर्भामध्ये राज्य शासन 50 टक्के वाटा उचलण्यास तयार आहे अशा आशयाचे पत्र रेल्वे मंत्री यांना देण्यात आले होते. परंतु राज्यामध्ये सत्ताबदल झाला आणि ही योजना पुढे नेण्यास हे सरकार उत्सुक दिसत नाही. याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारला एक पत्र देऊन या योजनेस सहकार्य करण्याची विनंती केली. परंतु सध्याच्या सरकारने याबाबत पक्षपातीपणाची भूमिका घेतली आहे व या मतदारसंघातील जनतेवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्येही आपण लक्ष घालून हा प्रश्न निकाली निघण्यासाठी संबंधितांना आदेश देऊन ही योजना पूर्ण करावी व करोडो श्रद्धाळू भाविकांसाठी या रेल्वेचा उपयोग व्हावा व निधीची तरतूद केंद्रात करावी, अशी भूमिका घेतली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्टा साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा-देवघर या प्रकल्पाबाबत माहिती देण्यात आली. 1984 मध्ये या धरणाची निर्मिती झाली. 2000 मध्ये ते पूर्ण करण्यात आले. परंतु, कालव्याची कामे प्रलंबित ठेवण्यात आली जर ही कामे पूर्ण झाली असती तर प्रकल्पातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध झाले असते.
माढा मतदार संघातील तसेच सातारा मतदार संघातील खंडाळा-फलटण, माळशिरस सांगोल्यातील काही भाग 100 किलोमीटर अंतराच्या लोकांना पाणी पोहोचवणे, हा त्याचा मुख्य उद्देश; परंतु 21 वर्षांमध्ये या योजनेस एकशे आठ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला व ही योजना रखडवण्यात आली. धरणातील पाणी त्यावेळीचे व आताचे राज्यकर्त्यांनी पाणी स्वतःच्या मतदारसंघाकडे वळवले. या योजनेस कमीत कमी 1000 करोडची आवश्यकता आहे. तरी आपण या योजनेस निधी उपलब्ध करून देण्याबाबत आपल्या स्तरावर आदेश द्यावेत. कारण, या योजनेचे फक्त 21 वर्षांमध्ये फक्त 65 किलोमीटर काम पूर्ण झाले आहे.
या मतदार संघाचे यापूर्वी माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी नेतृत्व केले आहे. परंतु हा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न त्यांनी जाणीवपूर्वक सोडवला नाही, याउलट त्यांनी हे पाणी बारामती मतदारसंघाकडे नेण्यात आले. परंतु महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हे पाणी पुन्हा या दुष्काळी पट्यातील या लोकांना देण्यात आले. त्यामुळे दुष्काळी भागाला हे पाणी म्हणजे अमृतच आहे, असं समजून यांचे स्वागत करण्यात आले. परंतु राज्यामध्ये सत्ताबदल झाला आणि खा. शरद पवार यांनी पुन्हा हे पाणी बारामतीकडे नेण्यात आले तरी याबाबत मूळ नीरा-देवघर प्रकल्पास निधीची आवश्यकता आहे, तो आपण पूर्ण करण्यासाठी केंद्रातून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा व पर्यायी नीरा-देवधर प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईनद्वारे सुद्धा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास माळशिरस, फलटण, सांगोला, पंढरपूर या भागातील दुष्काळी भागातील शेतकर्यांना पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल या दुष्काळी भागाचा दुष्काळी हा शब्द कायमस्वरूपी निघून जाईल यामुळे या मतदार संघातील जनता सदैव आपले ऋणी राहील.
तसेच माण-खटाव तालुक्यांतील दुष्काळी भागासाठी गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कटापूर) केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत राबवली जात आहे. यामध्ये माण-खटाव तालुक्यांतील 67 दुष्काळी गावाचा समावेश आहे. या प्रकल्पामध्ये 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
या प्रकल्पासाठी 1061.34 कोटी अंदाजे खर्च अपेक्षित आहे, त्यास शासनाने मान्यता दिली आहे, त्याबाबतचा निधीही प्राप्त झालेला आहे 2020 अखेर या प्रकल्पावर 587.68 इतका खर्च झालेला आहे सद्यपरिस्थितीत जिहे-कठापूर बॅरेज चे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. 20-21 मध्ये 0.35 टीएमसी पाणी साठा करण्याचे नियोजन आहे 2022-23 मध्ये ही योजना पूर्ण कार्यान्वित करून 27500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली निर्माण करण्याचे नियोजन आहे त्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून 100 टक्के निधी प्राप्त व्हावा अशीही मागणी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले. या सर्व चर्चावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन निंबाळकर यांना देण्यात आले. त्यामुळे हे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, अशीही भावना खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
प्रतिमेच्या भेटीपेक्षा कामांची दिलेली यादी खूप मोठी : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी देशासाठी बलिदान देणार्या शूरवीरांची प्रतिमा भेट दिली. यावेळी हास्यविनोदाने आपण दिलेल्या भेटीपेक्षा मतदारसंघातील कामांची दिलेली यादी खूप मोठी आहे, तेच माझ्यावर मोठे ओझे आहे, असे पंतप्रधान हास्य विनोदामध्ये म्हणाले