सोमवारी सकाळी पुसेगाव येथून आले काढणीसाठी निघालेला टेम्पो औंध येथे आल्यानंतर खबालवाडी रस्त्याकडे जाणार्या पुलाजवळ पलटी झाल्याने टेम्पोतील 25 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली आहे. ठार झालेले संबंधित कामगार हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.
भोसरे : सोमवारी सकाळी पुसेगाव येथून आले काढणीसाठी निघालेला टेम्पो औंध येथे आल्यानंतर खबालवाडी रस्त्याकडे जाणार्या पुलाजवळ पलटी झाल्याने टेम्पोतील 25 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली आहे. ठार झालेले संबंधित कामगार हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवारी (दि. 7) पुसेगाव येथून आले काढणीसाठी निघालेला एक टेम्पो सकाळी साडेसातच्या सुमारास औंधनजीकच्या खबालवाडी रस्त्याकडे जाणार्या पुलानजीकच्या वळणावर आला असता अचानक पलटी झाल्याने टेम्पोमधील दोनजण ठार झाले आहेत. तर टेम्पोत असणार्या इतर जखमी कामगारांवर औंध ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, पोलीस नाईक प्रशांत पाटील, पोळ आदींनी भेट दिली.
या घटनेची औंध पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.