‘तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अनफळे गावापर्यंत पोहोचले याचा आनंद वाटतो,’ असे उद्घार माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी काढले.
वडूज/मायणी : ‘तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अनफळे गावापर्यंत पोहोचले याचा आनंद वाटतो,’ असे उद्घार माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी काढले.
तारळीच्या पाण्याचे अनफळे येथे सरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या हस्ते पाणीपूजन झाले. त्यानिमित्त ते बोलत होते.
डॉ. येळगावकर म्हणाले, ‘तारळी उपसासिंचन योजनेचे पाणी खटाव तालुक्यातील अनफळे या शेवटच्या गावात माळीनगर मार्गाने तसेच मायणी परिसरात वाघमोडे तलाव, यलमर वस्ती, मोराळे, गुंडेवाडी या शेवटच्या टोकापर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचते. शासनाकडे कोरोनाच्या कालावधीत निधीची कमतरता असल्याने अनफळे गावातील सरपंच पिंटू यलमर, चेअरमन बाळासाहेब कंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतकर्यांकडून सुमारे अडीच लाख रुपयांचा निधी जमा केला. तर वडूज बाजार समितीचे माजी चेअरमन सी. एम. पाटील यांच्या मदतीने काही सिमेंट पाईप मिळवून दोन किमी खोदकाम करून हे पाणी अनफळे तलावात आणण्यात आले. अभिजित काबुगडे, पांडुरंग पडळकर, महादेव ढवळे, शहाजी काबुगडे व अन्य शेतकर्यांनी निधी जमा करून हे पाणी वाघमोडे तलावात आणले.’
याबाबत आपण पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंता शिल्पा राजे, तारळी योजनेचे अभियंता गायकवाड, डेप्युटी इंजिनिअर परुळेकर यांच्या सहकार्याने तारळी योजनेच्या पाण्याचे आवर्तन जास्त दिवस वाढवून घेतले. पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यात यश आले.
यामुळे अनफळे, मायणी, धोंडेवाडी, गुंडेवाडी या परिसरातील शेतकर्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.