माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर वाढदिवस शुभेच्छा स्वीकारण्यासाठी फलटण येथे उपलब्ध नसल्याने अनेकांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या तर दिल्ली येथे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना रेल्वेमंत्री ना. पियुष गोयल यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.
फलटण : माढा लोकसभा मतदार संघाचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर वाढदिवस शुभेच्छा स्वीकारण्यासाठी फलटण येथे उपलब्ध नसल्याने अनेकांनी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या तर दिल्ली येथे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना रेल्वेमंत्री ना. पियुष गोयल यांनी प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या.
भाजपची एक महत्त्वाची बैठक आणि अन्य कामांसाठी खा. नाईक-निंबाळकर दिल्लीत असल्याने त्यांना वाढदिवस शुभेच्छा स्वीकारणे व त्या निमित्ताने सर्वांशी सुसंवाद यासाठी मतदार संघात उपस्थित राहता आले नाही, त्याचप्रमाणे शुभेच्छा स्वीकारता आल्या नसल्याचे त्यांच्या निकट वर्तीयांनी सांगितले.
दरम्यान, आज दूरध्वनी संपर्काद्वारे अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, खा. उदयनराजे भोसले, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खा. श्रीनिवास पाटील, खा. ओमराजे निंबाळकर, खा. जयराम स्वामी, आ. जयकुमार गोरे, आ. शहाजी बापू पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, आ. राहुल कुल, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मदन दादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, सोलापूर जिल्हा भाजप अध्यक्ष श्रीकांत देशमुख, सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष विक्रम पावसकर, शासकीय अधिकारी, पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह मतदार संघातील नागरिकांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.