थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती विहे, ता.पाटण येथे साजरी करण्यात आली.
विहे : थोर साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती विहे, ता.पाटण येथे साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय मधुकर सरगडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ते म्हणाले की, अण्णा भाऊ साठे प्रतिभावंत साहित्यिक होते. त्यांनी आपल्या साहित्यातून गोरगरीब, उपेक्षित यांची दुःखे वास्तवतेने मांडली. विविध साहित्य प्रकार हाताळलेले अण्णा भाऊ साठे यांच्या विशेषतः कादंबऱ्यांचे देशातील तसेच परदेशातील विविध भाषेत अनुवाद झाले. त्यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.
यावेळी अजय गायकवाड, राहुल सरगडे, आनंदराव संकपाळ, सर्जेराव सरगडे, नंदकुमार साबळे, बापूराव साठे, राजेंद्र साठे, इंद्रजित सावंत, विशाल साठे, विशाल भिंगारदिवे, विशाल साठे, अभिजित गायकवाड, शुभम साबळे उपस्थित होते.