विजयनगरची जिल्हा परिषद शाळा ठरली सातारा जिल्ह्यातील पहिली ई लर्निंग शाळा
विजयनगर ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
Published:Aug 21, 2020 06:27 AM | Updated:Aug 21, 2020 06:27 AM
News By : Muktagiri Web Team
कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु राहणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन शिक्षणामध्ये पालकांना येणार्या अडचणींचा विचार करून विद्यार्थ्यांना वापरता येईल असे सहज सोपे अॅप्लिकेशन उपलब्ध करून देणेत आले आहे त्याचा सर्वांनी मुलांच्या शिक्षणासाठी वापर करावा यासाठी विजयनगर गावाचे मार्गदर्शक माजी आमदार आनंदराव पाटील व बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शाळेत घेणेत आला.
कराड ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर या शाळेत विदयार्थ्यासाठी मोफत ई लर्निंग अॅपची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थांना ऑफलाईन वापरता येईल असे शैक्षणिक अॅप विजयनगर ग्रामपंचायतीतर्फे मोफत विद्यार्थाना उपलब्ध करून देणेत आले आहे.
या अॅपमध्ये 1 ली ते 7 वी पर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रस्तावना ,सराव, अभ्यास, परीक्षा, खेळ अश्या प्रकारची विदयार्थ्यांना उपयुक्त अशी सहजसोपी व मनोरंजक मांडणी हे या अॅपचे वैशिष्ट आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षण सुरु राहणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाईन शिक्षणामध्ये पालकांना येणार्या अडचणींचा विचार करून विद्यार्थ्यांना वापरता येईल असे सहज सोपे अॅप्लिकेशन उपलब्ध करून देणेत आले आहे त्याचा सर्वांनी मुलांच्या शिक्षणासाठी वापर करावा यासाठी विजयनगर गावाचे मार्गदर्शक माजी आमदार आनंदराव पाटील व बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शाळेत घेणेत आला.
याच कार्यक्रमात ग्रामपंचायत विजयनगर यांच्या सौजन्याने इयत्ता 1 ली मध्ये नव्याने दाखल झालेल्या सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्याला वर्षभर पुरेल असे सर्व साहित्य देणेत आले. यामध्ये स्पोर्ट ड्रेस ,स्कूल बॅग , वह्या ,अंकलिपी, पाटी ,पेन्सिल, शिसपेन्सिल ,खोडरबर, शार्पनर , पट्टी व बॉटल असे सर्व साहित्य मुलांना देणेत आले. शाळेकडून सर्व साहित्य मिळाल्यामुळे आर्थिक हातभार मिळाल्याने अनेक पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला सुनील पाटील , सरपंच संजय शिलवंत, उपसरपंच विश्वास पाटील, रामचंद्र जाधव अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, स्टार एज्युकेशनचे संचालक राहुल तारळेकर, प्रशांत भोसले, दिपक जानकर, राजकिरण पाटील, ग्रामस्थ, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते .