‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत,’ असे मत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जि. प. सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.
वडूज : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत,’ असे मत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जि. प. सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त वडूज येथे पंचायत समितीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी सभापती कल्पनाताई खाडे, माजी सभापती संदीपदादा मांडवे, हर्षदा देशमुख, नंदकुमार मोरे, पृथ्वीराज गोडसे, डॉ. संतोष देशमुख, अक्षय थोरवे, विजय खाडे, अमोल बोटे, सदाशिव बागल, ज्ञानेश्वर शिंदे, चेतन बागल, बाळासो पोळ आदी उपस्थित होते.
प्रा. गोडसे म्हणाले, ‘शरद पवारांनी विकासप्रक्रिया व सत्तेच्या राजकारणात नेहमीच समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले. त्यांचे विचार व कष्ट घेण्याच्या सवयीमुळेच आज पक्षाला चांगले दिवस आले आहेत. पक्षाने मला काय दिले हे पाहण्यापेक्षा मी पक्ष व समाजासाठी काय करतो, याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मोठी संधी मिळूनसुद्धा पक्ष वाढीसाठी प्रयत्न न करणार्यांना यावेळी त्यांनी भाषणात फटकारले.’
नंदकुमार मोरे म्हणाले, ‘पवार यांच्यामुळेच आज राज्यात कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले आहेत. भविष्यात केंद्रातही परिवर्तन घडू शकते. शरद पवार या परिवर्तनाचे केंद्रबिंदू राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीसाठी समर्पित भावनेने काम करावे.’
संदीप मांडवे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.