दोन कथित ’देवऋषी’च्या भूत लागल्याच्या सल्ल्याला भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची बातमी आज प्रसिध्द झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.
दहिवडी : दोन कथित ’देवऋषी’च्या भूत लागल्याच्या सल्ल्याला भुलून पालकांनी योग्य वैद्यकीय उपचार न केल्यामुळे चौदा वर्षीय मुलीचा हकनाक बळी गेल्याची बातमी आज प्रसिध्द झाल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.
काल या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी वेगाने हालचाली करुन याप्रकरणी उत्तम अवघडे (गोंदवले, ता. माण) व रामचंद्र सावंत (मोही, ता. माण) हे दोन्ही देवऋषी ताब्यात घेतले. तर मयत मुलीच्या कुटुंबियांना शोधण्यासाठी पोलीस पथक पाठवले. या पोलीस पथकाने सदर कुटुंबियांना मायणी (ता. खटाव) येथून ताब्यात घेवून दहिवडी येथे आणले.
दोन्ही देवॠषीना दहिवडी पोलीसांनी आज ताब्यात घेवून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीशांनी दोघांनाही 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तसेच मयत मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेण्यात पोलीसांना यश आले असून सायंकाळच्या सहाच्या सुमारास मृतदेह जेसेबीच्या साहयाने उत्खनन करण्यात आला यावेळी तहसीलदार बाई माने, सपोनि राजकुमार भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित, पोलिस उपनिरीक्षक देवानंद तुपे, सर्कल अधिकारी महाडिक, महसूल साह्ययक तुषार पोळ, तलाठी सूर्यवंशी उपस्थित होते
रात्री आठच्या सुमारास दहिवडी माणगंगा नदी मध्येच मृतदेहाच पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले व पुन्हा मृतदेह नदी पत्रात पुरण्यात आला आहे.