कृषी उत्पादनवाढीसाठी कृष्णा कृषी परिषदेची स्थापना : डाॅ. सुरेश भोसले
अशोकराव थोरात यांची अध्यक्षपदी निवड : डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे नियोजन
Published:Apr 05, 2022 12:18 PM | Updated:Apr 05, 2022 12:18 PM
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : सर्वसामान्य शेतकरी व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादन वाढीसाठी, कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनासाठी कृष्णा कृषी परिषदेची स्थापना करण्यात आले आहे. परिषदेच्या अध्यक्षपदी कृषीतज्ञ अशोकराव थोरात यांच्या निवडीची घोषणा कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. तसेच परिषदेच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यामध्ये सहकार महर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी कृष्णा बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्यासह कृष्णा कारखान्याचे संचालक उपस्थित होते.