कोरेगाव, खटाव तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 86 लक्ष
खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर
Published:Dec 06, 2021 06:58 AM | Updated:Dec 06, 2021 06:58 AM
News By : कराड | संदीप चेणगे
कराड : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कोरेगाव व खटाव तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 86 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून हा निधी मंजूर झाला आहे. मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने विकासकामांना गती येणार आहे. कोरेगाव तालुक्यातील अंगापूर, रहिमतपूर, अंभेरी, कार्तिकस्वामी देवालय रस्ता प्रजिमा 87 साक्रं 15/00 ते 17/00 सुधारणा करणे 25 लक्ष रुपये, धामणेर, सासुर्वे, शिंरबे, एकंबे रस्ता (भाग शिंरबे ते एकंबे ) इजिमा 84 साक्रं 9/00 ते 14 /00 सुधारणा करणे 25 लक्ष, आर्वी, पिंपरी, सुर्ली, बोरगांव रस्ता (भाग चोरगेवाडी ते बोरगांव) इजिमा 88 साक्रं 11/00 ते 13/500 सुधारणा करणे 25 लक्ष, शिरंबे, निगडी, अपशिंगे, अंभेरी, आर्वी, साठेवाडी रस्ता इजिमा 82 भाग अपशिंगे ते निगडी सुधारणा करणे 16 लक्ष, त्रिपुटी, शिरढोण, एकसळ ते रामा 142 रस्ता इजिमा 81 भाग मुगांव फाटा ते जरेवाडी सुधारणा करणे 19.62 लक्ष, कठापूर, शिरठोण रस्ता ग्रामा 12 सुधारणा करणे (भाग उर्वरीत लांबी) 33.41 लक्ष, कुमठे गावातून जाणारा जुना रस्ता ग्रामा 96 सुधारणा करणे 15 लक्ष, वडाचीवाडी एकंबे ग्रामा 110 रस्ता सुधारणा करणे 45 लक्ष, कण्हेरखेड येथे स्मशानभूमी सुशोभिकरण करणे 3 लक्ष, वेलंग येथे स्मशानभूमि संरक्षक भिंत बांधणे 4 लक्ष, एकंबे स्मशानभूमि विधी शेड सुशोभीकरण करणे 4 लक्ष, आझादपूर स्मशानभूमि संरक्षण भिंत बांधणे 4 लक्ष, कुमठे गावातील अंतर्गत रस्ते आरएमसी करणे 4 लक्ष, वाठार किरोली अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 4 लक्ष, कोंबडवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 4 लक्ष खटाव तालुक्यातील रा.मा.141 ते नेर, ललगुण ते इजिमा 77 इजिमा 95 साक्र 6/00 ते 9/500 सुधारणा करणे 26 लक्ष, औंध, गणेशवाडी, कळंबी, गिरीजाशंकरवाडी इजिमा 97 साक्र 9/00 ते 12/00 सुधारणा करणे 20 लक्ष पवारवाडी (पुसेगाव) स्मशानभूमि मध्ये हायमास्ट लॅम्प बसविणे 1.5 लक्ष, कातवडी अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 3 लक्ष, पुसेगाव अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.