‘वीज वितरण कंपनीकडून सध्या शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली केली जात आहे. कंपनीने ही पिळवणूक तातडीने थांबवावी,’ अशी मागणी भूमाता शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मराज जगदाळे यांनी तहसीलदारांकडे निवेनाद्वारे केली आहे.
वडूज : ‘वीज वितरण कंपनीकडून सध्या शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली केली जात आहे. कंपनीने ही पिळवणूक तातडीने थांबवावी,’ अशी मागणी भूमाता शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मराज जगदाळे यांनी तहसीलदारांकडे निवेनाद्वारे केली आहे.
तहसीलदारांना निवेदन दिल्यावर आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी तालुकाध्यक्ष सागर सावंत, सरपंच शंकर गोळे-पाटील, नाना सावंत, चांगदेव सावंत, मयूर माने, विनायक सावंत, माणिकराव कदम, बाळासाहेब जाधव यांची उपस्थिती होती.
याबाबत अधिक माहिती सांगताना जगदाळे म्हणाले, गेल्या वीस वर्षांत दहावेळा सुका व ओला दुष्काळ पडला आहे. या परिस्थितीत विजेचा शेतकर्यांकडून कसलाही वापर झाला नाही.शेती पंपासाठी पर एचपी 155 रुपये अनुदान असते. शेतकर्यांना तर फक्त आठ तासच वीज मिळत असते, मग चोवीस तासाचे बील कसे, असा सवाल ही त्यांनी व्यक्त केला.
वीज वितरण यंत्रणेची आयुष्य मर्यादा वीस वर्षांची असते. मात्र, साठ वर्षे झाली तरी यंत्रणा बदलली नाही. त्यामुळे तोटा होत आहे. यंत्रणेचे आयुष्य संपल्याने वीज खंडित होणे, मजुरीचा खर्च जास्त व उत्पादनात तोटा, तयार तुटून पिके जळणे, पशु व मनुष्याचे अपघात होणे, जुन्या यात मुले युनिटमध्ये वाढ, चाळीस वर्षाचा ज्यादा स्थिर आकार हा सर्व भुर्दंड शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. या प्रकारची सखोल चौकशी करून शेतकर्यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशारा ही जगदाळे यांनी दिला आहे.
विजेनंतर सहकार, उसाचा विषय हाती घेणार
आर्थिक वर्षाखेरीच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीच्या पिळवणुकीचा विषय घेतला आहे. भविष्यात सहकार क्षेत्रातील अनागोंदी तसेच ऊस साखर कारखानदार व इतर घटकांकडून होणार्या शेतकरी पिळवणुकीचा विषय हाती घेणार आहोत.खटाव-माण या दुष्काळी तालुक्यातील प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.