महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कलावंतांना आर्थिक मदत मिळण्याबाबत वडूज तहसील प्रशासनास खटाव तालुका शाखेतर्फे निवेदन देण्यात आले.
वडूज : महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कलावंतांना आर्थिक मदत मिळण्याबाबत वडूज तहसील प्रशासनास खटाव तालुका शाखेतर्फे निवेदन देण्यात आले.
या निवेदनातील अधिक माहिती अशी की, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ वाद्य कलाकारांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे या कलाकारांच्या दैनंदिन उपजीविकेचा प्रश्न निर्माण होण्याबरोबर काहींना उपासमारीची वेळ आली आहे. तरी शासनाने अशा कलाकारांना सानुग्रह अनुदान तातडीने देण्याची व्यवस्था करावी.
निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी कमले, नवनाथ शिंदे, ज्ञानदेव करे, प्रकाश नामदेव, खटाव तालुका प्रमुख अशोक जावीर, उपाध्यक्ष साहेबराव केंगार, जयशिंग शेलार, गणेश भोसले, प्रशांत केंगार, प्रशांत बनसोडे, महादेव जावीर, जयसिंग जावीर, लक्ष्मण केंगार, शेखर जावीर आदींच्या सह्या आहेत.
तहसील प्रशासनाच्यावतीने अव्वल कारकून विलास जाधव यांनी निवेदन स्वीकारले.
Jay Bhim nagar Degloor