सातारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनूसार दि. 20जुलै रोजी सातारा जिल्ह्याला अतिवृष्टी चा (Heavy to very Heavy Rainfall at Isolated places in ghat areas very likely) ऑरेज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दि. 20जुलै2023 रोजी सुट्टी जाहिर केली आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जितेंद्र डुडी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व दिनांक 02/08/2019 च्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके (पाटण, महाबळेश्वर, जावली, वाई आणि सातारा) मधील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक 20 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहिर केली आहे. तसेच आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी असे संबंधितांना आदेशित केले आहे. सदर साध्या आदेश त्यांनी 19जुलै2023 रोजी दिला आहे.