कातरखटाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांची दैना उडाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या झळा सोसून कसातरी सावरलेल्या बळीराजाला अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
कातरखटाव : कातरखटाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांची दैना उडाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या झळा सोसून कसातरी सावरलेल्या बळीराजाला अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटेपासून अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांची धांदल उडाली. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांची काढणी सुरू आहे. कणसांची, कडब्याची शेतातच पसर पडली आहे. अशातच अचानक पावसाने सुरुवात केल्याने पहाटेच्या साखर झोपेत असलेला शेतकरी जागा झाला आणी शेताकडे धाव घेतली. पण तोपर्यंत ज्वाराची कणसे, हरभरा, गहू पावसात भिजून गेल्याने मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.
शेतकर्यांची पिकांची काढणी सुरू असल्याने धान्य काळे पडणार, कडबा खराब होणार आणि दर कमी मिळणार या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.