कराडनजीक महामार्गावरील पादचारी पुलात अडकला कंटेनर
News By : मलकापूर I सुनिल परिट
महामार्ग ओलांडण्यासाठी बनवलेला पादचारी पुलाला उंच माल भरलेल्या कंटेनरची धडक झाली. सातारा कोल्हापूर लेनवर गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यापुर्वीही उंची वाहन धडकल्याने पुलाचा बीमच चार इंचाने सरकला आहे. अशीच वारंवार उंची वाहन वारंवार धडकल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यातील मोठा अनर्थ टाळण्यासाठी तपासणी करून उपाय करावा अशी मागणी होत आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वाहनचालकांनी वेगाने वाहने चालवण्याची स्पर्धाच लावलेली असते. महामार्ग रूंदिकरणापूर्वी शेंद्रे ते पेटनाका या ऐशी किलोमीटरच्या पट्ट्यात दिवसातून किमान एक दोन अपघात घडत होते. सुरक्षित वाहतूक व अपघात कमी करण्यासाठी महामार्गाचे रूंदिकरण करण्यात आले. यावेळी सुशोभिकरणासह ठिकठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग व गरजेनुसार पादचारी पुलाची निर्मिती केली. रुंदिकरणानंतर अपघाताचे प्रमाण काहीं अंशी कमी झाले. मात्र रस्ता मोठा झाल्यामुळे वेगाने वाहने चालवण्याची स्पर्धा सुरु झाली. आशा परिस्थितीत महामार्ग ओलांडणे कठीण झाले. येथील कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूलाची निर्मिती केली. मलकापूर शहरातील ते कृष्णा रूग्णालय या पट्ट्यात दुतर्फा अनेक व्यावसाय थाटले आहेत. या परिसरात वरदळ असते. म्हणून पादच्याऱ्यांना महामार्ग ओलांडण्यासाठी तो उड्डाणपूल संपला त्याच ठिकाणी पादचारी पुलाची निर्मिती केलेली आहे. सातारा-कोल्हापूर लेनच्या उड्डाणपूलाचा उतार व पादचारी पुल यामधील उंचीबाबत थोडीसी तांत्रिक चूक असल्यामुळे अनेकवेळा उंची वाहन मार्गस्त होताना कसरत करावी लागते. कांहीवेळातर उंची माल असलेल्या वाहनांना परत जाऊन हॉटेल पंकजपासून उपमार्गावरून जावे लागले आहे. गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास चालकाला अंदाज न आल्याने उंची माल भरलेले वाहन पादचारी पुलाला धडकले. ते वाहन पुलाखालीच अडकून पडले. त्यामुळे या लेनवरील वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग देखभालच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने एक तासाच्या अथक प्रयत्नाने संबंधित वाहनातील हवा सोडून उंची कमी करून वाहन बाजूला केले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.