खटाव तालुक्याची जीवनवाहिनी येरळा (वेदावती) नदीवरील ब्रिटिशकालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला रानवेली व झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे भिंतीला धोका पोहोचण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने रानवेली व झुडपे छाटावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
खातगुण : खटाव तालुक्याची जीवनवाहिनी येरळा (वेदावती) नदीवरील ब्रिटिशकालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला रानवेली व झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे भिंतीला धोका पोहोचण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने रानवेली व झुडपे छाटावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
खटाव तालुक्यातील उत्तरेला असलेला ब्रिटिशकालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, या तलावाचे बांधकाम राणी व्हिक्टोरियाच्या काळात झाले होते. 11.87 द.ल.घ.मि 416.40 द. ल. घं. फु 650 हेक्टर क्षेत्रात हा तलाव आहे.
खरिपाला योग्य पाऊस पडल्याने सुगी जोरात सुरू झाली आहे तर बहुतांश शेतकर्यांचे, सोयाबीन, घेवडा, मूग, बटाटा, मटकी, चवळी ही नगदी पिके शेतातच असून पाऊस मोठा झाल्याने नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला आणि आता रब्बी पिकाची काळजी मिटली असली तरी सांडव्याच्या भिंतीवरील झाडे मात्र धोक्याची सूचना देत असून प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.