कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून वडूज येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारणार आहेत.
वडूज : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून वडूज येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारणार आहेत.
नुकतीच याबाबत त्यांची तहसीलदार किरण जमदाडे यांच्याशी चर्चा झाली.
यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, अॅड. अजित घाडगे, परेश जाधव, धनंजय क्षीरसागर, आयाज मुल्ला उपस्थित होते.
यासंदर्भात माहिती देताना देशमुख यांनी सांगितले की, दिवसेंदिवस गावोगावी कोरोना संसर्ग वाढू लागला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत नागरिक व कार्यकर्त्यांकडून बेडची मागणी होत आहे. शासकीय आरोग्य व्यवस्थेला काही मर्यादा आहेत. तर खासगी रुग्णालयांत महागडे उपचार घेणे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नाही. त्यातूनही प्रयत्न करूनसुद्धा ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना वार्यावर न सोडता काहीअंशी दिलासा देण्यासाठी वडूजला मध्यवर्ती ठिकाणी सूतगिरणीच्या माध्यामतून कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
या बैठकीनंतर देशमुख व सहकार्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकार्यांबरोबर चर्चा करण्याबरोबर प्रत्यक्ष कोरोना कक्षात जाऊन रुग्णांची विचारपूस केली.
आणि तो कर्मचारी थंड झाला...
कोरोना कक्षातून देशमुख व सहकारी कार्यकर्ते बाहेर येत असताना दैनंदिन कोरोना टेस्ट करणारे गीते नावाचे कर्मचारी समोर आले. व त्यांनी आपण गेली दीड वर्ष एकटीच तपासण्या करीत आहोत. आपल्या रूममध्ये साधी फॅनची सुविधाही नाही, असे तावातावाने सांगितले. त्यावेळी ते कर्मचारी चांगलेच तापले होते. मात्र, रणजितभैय्यांनी शांतपणाने त्यांची अडचण ऐकून घेतली. लागलीच फोन करून फॅन बसविण्याची व्यवस्था केली. अन् त्यानंतर तापलेला तो कर्मचारी थंड झाला.