कोविड सेंटरसाठी कलेढोण कुटीर रुग्णालयाचा वापर करावा

खटाव तालुका सोशल फाउंडेशनसह अन्य संघटनांची मागणी
Published:Aug 28, 2020 12:06 PM | Updated:Aug 28, 2020 12:06 PM
News By : Muktagiri Web Team
कोविड सेंटरसाठी कलेढोण कुटीर रुग्णालयाचा वापर करावा

खटाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य आजाराचा विळखा वाढत चालला आहे. सध्या तालुक्यात कार्यरत असणारी कोविड सेंटर अपुरी पडत आहेत. अशा परिस्थितीत कलेढोण येथील कुटीर रुग्णालयाचा कोविड सेंटरसाठी प्रशासनाने वापर करावा, अशी मागणी खटाव तालुका सोशल फाउंडेशनसह अन्य सामाजिक संस्था, संघटना व प्रतिष्ठित नागरिकांनी केली आहे.